Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Monday 15 January 2024

मकरसंक्रांत

 आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात, त्यामुळे आपल्या भारत देशाला "सणांची भूमी" असेही म्हटले जाते. प्रत्येक सण, उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक, शास्त्रीय कारणं, कथा, प्रदद्या आहेत.  जेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात, धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. एका राशीतुन दुस-या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रीयेला संक्रांती म्हणतात. वर्षभरात प्रत्येक महिन्याला एक अशा बारा संक्रांती येतात. परंतु पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीला खास महत्व आहे. सुर्याचा एका राशीतून दुसन्या राशीत प्रवेश म्हणजेच परिवर्तन. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर दिवसामधे परिवर्तन होते. मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होत जातो, आणि राज लहान होत जाते. या दिवसापासून सूर्य तापायला तयार होतो आणि वातावरणात असणारा गारवा, हुडहुडी भरणारी थंडी गायब होण्यास सुरवात होते. आयुष्यात जर आनंद, उत्साह, सुख नसेल तर माणूस नैराश्याकडे  जातो, म्हणून जीवनात उत्साह, आनंद निर्माण करणाऱ्या क्षणांची खूप आवश्यकता असते, आणि हे आनंदाचे क्षण आपल्याला सणांमुळे मिळतात. म्हणून आपल्या संस्कृतीत सणांना विशेष महत्व आहे. मकर संक्रातीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. पतंगाप्रमाणे उत्साहाने, साहसाचे पंख लावून हवेत उडावे पण शिस्त, नियम, संयमाची दोर ही सोबत असायला हवी, नाहीतर पतंग हवेत भरकटायला लागतो. पतंग जेव्हा हवेत उडत असतो, तेव्हा एक पतंग दुसऱ्या पतंगात अडकला  जातो. त्यावेळेस ढील सोडली तर पतंग न  अडकता वेगळा होतो आणि जर दोरा ओढला तर पतंग कापला जातो, तसेच आपल्या मानवी नात्यांचे ही असते. 


There are so many reasons to enjoy this beautiful life.

Sunday 23 April 2023

जागतिक पुस्तक दिन* 📚📖📖📚

 *जागतिक पुस्तक दिन*

📚📖📖📚


२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आणि जगप्रसिध्द साहित्यिक *शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही!* वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणा-यांना नक्कीच आणता येईल.


एखाद्या गोष्टीची सवय किंवा शिस्त लावायची असेल तर ती आपण टाकून ठोकून लावू शकतो. सकाळी एक तास व्यायामाची सवय व्यायाम करायला लावून लागू शकते. पण व्यायामाची गोडी त्याने निर्माण होणार नाही. वाचनाच्याही गोडीचं तसंच आहे. मुलांना ”आता वाचत बसा बरं का रे! उगीच हुदंडू नका!” असं म्हणून खोलीत कोंडून घातलं तर मुल वाचतील, कारण दुसरा पर्याय नाही आणि पुस्तक हातात आहेत पण वाचनाचा आनंद अशा सक्तीच्या वाचनाने कसा मिळेल? वाचन ही फक्त क्रिया घडेल. त्या कृतीचा आनंद मिळणार नाही. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हायला तसं वातावरण असणं ही मुलगामी गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, ग्रंथपाल सर्वांनाच महत्वाची भूमिका बजावता येईल. पालकाचाच विचार करायचा झाला तर किती घरात मुलांना वाचनासाठी उदयुक्त केलं जातं? ”अभ्यास कर!” हा मंत्र सतत मुलांच्या कानावर बिंबवला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके मुलांना घेऊन देणं हे सामान्यत: घडत नाही. याला काही सुजाण पालकांचे अपवाद असतीलही, पण सामान्यता अभ्यासाचं पुस्तक घेऊन मुलं बसली आहे. आई वडील ते कौतुकाने बघताहेत अशावेळी त्यांच्या तोंडावर समाधाना फुललेलं दिसेल. तेच मुल इतर कुठलं पुस्तक हातात घेऊन बसलेलं दिसलं की कंपाळावर सुक्ष्म आठया चढल्याच! ”काय रे काय वाचतो आहेस?” परीक्षाजवळ आली आहे ना? अभ्यास झाला का? हा प्रश्न येतोच. परीक्षा जवळ आली की मुलांनी फक्त अभ्यासाची पुस्तकं वाचायची? अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी थोडावेळ इतर वाचनात घालवणं गरजेचं असणं हे पालकांना का समजू नये?. सतत एक तंत्री काम असलं की मोठी माणसं विरंगुळा म्हणून दुसरं काही तरी शोधतातच. मुलांनाही असा विरंगुळा मिळाला तर ती जास्त ताजीतवानी होऊन तल्लख मेंदूने अभ्यास करतील.किती पालक स्वत: पुस्तकं वाचतात? घरात मोठी माणसं पुस्तक वाचन करीत असतील तर लहानपणापासून मुलाला वाचन या क्रियेचं कुतूहल निर्माण होतं. आई-वडील किंवा घरातलं मोठं माणूस पुस्तक वाचत असेल तर एखादं दोन-तीन वर्षाच मुल त्यावेळी अगदी गप्प राहून मिळेल तो कागदाचा कपटा पुढे ठेवून वाचण्याचे नाटक करतं. एका परीने ते मोठयांच अनुकरण करतं. पण त्याचबरोबर वाचण या गोष्टीत काही तरी वेगळं आहे, काहीतरी आनंददायी आहे, त्यात रंगून जाणं याला खात्रीचा काहीतरी अर्थ आहे हे त्या बालमनात नकळत रुजण, वाचनाची गोडी निर्माण होण्याची पहिली पायरी इथे सुरू होते.


खरं तर घरातली मोठी माणसं आणि मुलं एकाचवेळी शांतपणे वाचत बसली आहेत हे दृश्य टिपून ठेवण्यासारखं आहे. पण हे किती घरात घडतं? ”मुलांच्या आणि आमच्या वाचनाच्या वेळा जमत नाही”. हे कारण नेहमीचच.मुलं टिव्ही बघतात, त्यांच्यावर नको त्या कार्यक्रमांचे परिणाम होत असतात. असे म्हणणा-या पालकांनी टिव्हीला सुंदर पुस्तकांचा पर्याय मुलांना दिला आणि वाचनासाठी शांत जागा आणि वातावरण उपलब्ध करून दिलं तर टिव्हीकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मोठया घरांमध्ये स्वतंत्र खोली देणंही शक्य असतं मात्र ती खोली त्यांच्या आवडत्या पुस्तकांनी भरलेली असायला हवी. असा प्रयोग केलेला आणि सफल झालेला आहे. ज्यांनी केला नाही त्यांनी करून पाहण्यासारखा आहे.


बाललेखिका लीलाताई भागवत यांनी मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी सांगितलेला (मराठी बालसाहित्य, प्रवाह आणि स्वरूप) प्रयोग आज दशक बदलले तरी या प्रयोगातले संदर्भ मात्र तेच लागू होतात असे वाटते. याच अनुषगांने मुलांच्या वाचनासाठी धडपड करणारे काही प्रयोग व मुलांचे वाचनाचे काही अनुभव –


नीला कचोळे एक गृहिणी. तिचा मुलगा आता इंजिनिअरींग शिकतोय. नीलाला वाचनाचा संस्कार तिच्या वडिलांकडून मिळाला. साहजिकच वाचनातील आनंद मुलालाही मिळावा, सवय लागावी म्हणून सुरूवातीला तिने मुलाला पुस्तक आणून देण्याचं काम केलं. तेव्हा रशियन जुनी पुस्तक खुल्या स्टॉलवर, गाडीवर मिळायची. रिकाम्या वेळात नीला पुस्तकं त्याच्या पुढयात टाकू लागली. स्वत: नीलाने ‘इनव्हिझीबल मॅन’ तिस-या इयत्तेत असतांना वाचलं होतं. त्याचा मराठी अनुवाद नीलाने मुलाला वाचायला दिला. पण तो काही केल्या वाचेना, पुस्तकांकडे वहेना. नीला म्हणते, “मी जाम घाबरले, अवांतर वाचन नाही म्हणजे काय? आपला मुलगा वाचनातील आनंदाला पारखा राहील या भीतीनेच नंतर मी अशा अनेक दुपार घालवल्या. मग भलेही वाचू नकोस पण पाच मिनिट पुस्तक समोर धर. तो अगदी अळमटळम करायचा. पण घेऊन बसायचा. शिवाय मी एक करायची त्याला वाचून दाखवताना इंटरेस्टिंग भाग आला की वाचन थांबवायच. एक दिवस असंच केलं असतांना मुलाने पुस्तक अक्षरश: हातातून ओढून घेतलं नी वाचायला लागला. तेव्हापासून आजपर्यंत वाचतोच आहे. टेक्निकल साईड आहे, तरी प्रचंड वाचतो. त्याला वाचनाची सवय लावतांना केलेल्या सक्तीच्या प्रयोगाचं आता हसायला येत खरं पण मनोरंजनाचा एक हक्काचा मार्ग आपल्या मुलाला दाखवला याचं समाधान वाटतं.”


भाग्यश्री केंगे, स्वत: सॉफ्टवेअर व्यावसायिक. मुलाना वाचन सवय लावताना तिने शास्त्रीय आधार घेतलाय. मुळातच भाग्यश्रीचा गर्भसंस्कारावर विश्वास आहे, पंरतू सध्या गर्भसंस्कारासाठी जी पॅकेजेस उपलब्ध आहेत, त्यापेक्षा वय वर्षे ६ पर्यंतची मेंदू विकसनाची प्रक्रिया तिला महत्वाची वाटते. मेंदूचा विकास व्हायचा असेल तर त्याला खाद्य् पुरवायला हवं. भाग्यश्रीने याबाबत एक नवखा प्रयोग केलाय. मुलं लहान असतानाच त्यांच्या खेळण्यात पुस्तकांची ओळख करून दिली. त्याचा परिणाम असा झाला की मुलगी दीड वर्षाची असल्यापासून शब्द ओळखायला लागली व नंतर मुळाक्षर शिकली. भाग्यश्री म्हणते, ” आमच्या घरची पुस्तकं कधीच आवरून ठेवण्यासाठी नसतात. चोवीस तास पुस्तकाचं कपाट उघड असतं. कदाचित तो पसारा वाटेल, पण माझ्यासाठी मुलांच्या खोलीतलं ते त्याचं अवकाश आहे. तसेच पुस्तकं जशी वाचायची असतात तशी ती जपायचीही असतात. हे मुल्य ही जाणिवपूर्वक मुलांमध्ये रूजवलयं. त्यामुळे वाचनालयाचं फाटक पुस्तक घरी आलं तरी ते दुरूस्त करून दिलं जातं. मुलां-मुलांमध्येच पुस्तकांची देवाण घेवाण होण्यासाठी पुस्तक भिशीचा प्रयोगही भाग्यश्रीने केलाय. दर महिन्याला माझ्याकडे कोणाचं पुस्तक येणार इथपासून ते त्या पुस्तकात काय आहे? कसं आहे? आवडलं इ. पर्यंत आपोआपच चर्चा मुलांमध्ये सुरू होणे. मुलांचा कल, वय, आवड, भाषा, आजूबाजूचं वातावरण बघून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी पुस्तक निवडणं यात पालकाचं कौशल्य आहे. भाग्यश्री म्हणते, ” सहा रूपयाची पालक जुडी घेताना पालक पनीरच्या डिशसाठी सत्तर रूपये विना तक्रार मोजले जातात. पुस्तक विकत घेतांना खुपदा असंच काहीसं घडतं आणि मग अगदी सुमार रंगीत चित्र नसलेली, अनाकर्षक पुस्तकांत रमायला मुलं का कू करतात.”


पुस्तक आणि मुलांसाठीचा इलेक्ट्रॉनिक मिडीया अगदी हातात हात घालून मैत्री करू शकतात. उदा. काही पुस्तकांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत. त्यावरील चित्र दाखवून मुलचं पुस्तक वाचण्याचं औत्सुक्य वाढवता येऊ शकेल. इ-बुकची ओळख करून देऊनही त्याच कार्यक्रमांच्या पुस्तकांबाबत मुलांना माहिती करून देता येईल. असे विविध प्रयोग भाग्यश्री करते. अगदीच सगळं मुल्यांवर आधारलेलं, पारंपारिक, पंचतंत्रातलं असायला हवं असा आग्रह नाही. मुलं अशातच रमायला हवी, त्या आशयातून त्याच बालविश्व समृध्द व्हायला हवं नि त्याचं पोषण व्हायला हवं एवढच!


*पुलंच्या गटण्याप्रमाणे, इयत्ता दहावीतील अमोघ पुस्तक वेडा. खरं तर पुस्तक वेडा म्हटल्यावर त्याचं कौतुक वाटायला हवं. पण या कौतुकाच्या मागे पुस्तकाचा शोधलेला आधार. नोकरीनिमित्त आईपासून दुरावलेला व आजीच्या सहवासात वाढणा-या अमोघने आपोआप पुस्तकांना जवळ केलय. एकटेपणा घालविण्यासाठी अमोघ हातात पडेल ते वाचून फस्त करतो. वाचनाचं वेड, सवय, लागण्याचं कारण काही का असेना पण वाचन क्रिया व यातून मिळणारा आनंद मुलांना समजायलाच हवा. पुढे मुलांनी त्याचा उपयोग कसा करायचा ते त्यांनी स्वत: ठरवावं. पण वाचनक्रिया व त्यातील आनंदाची ओळखच झाली नाही, रूजली नाही तर सुंदर अनुभवाला मुलं वंचित राहतील हे मात्र नक्कीच!*


🙏🙏📖📚📚📖🙏🙏

Saturday 22 April 2023

महात्मा बसवेश्वर

 *९०० वर्षापुर्वी लोकशाही संसदेचे जनक म्हणजे महात्मा बसवेश्वर*

         - ले.पंकज रा.कासार काटकर

=======================

आज पासुन ९०० वर्षापुर्वी जगात पहिल्यांदा प्रथम लोकशाहीची स्थापना करणारे संत म्हणजे महात्मा बसवेश्वर होय.म्हणुन बसवेश्वर हे संसदिय लोकशाहीचे जनक मानले जातात.बसवेश्वर यांचा जन्म सन ११०५ रोजी कर्नाटक राज्यातील विजापुर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला.त्यावेळेस ते ज्या विरशैव म्हणजे वाणी जातीत जन्मले होते,त्या काळी समाजात अंधाधुंदी,अंधश्रध्दा,पुजापाठ,कर्मकांड मोठ्या प्रमाणात होता.बहुजन मागास खालच्या शुद्र वर्ण लोकांना शिक्षण ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता.राजसत्ता ही धर्मसत्तेनुसार  चालत होती.राज्यव्यवस्थेवर धर्माचा अनिष्ठ चालीरिती रिवाजा जबरदस्त पगडा होता.त्याकाळी साधी सोपी सहज धर्माची मांडणी करुन धर्माला नवचैतन्य देणारे संत बसवेश्वर महान प्रबोधनकार म्हणायला हवेत.


*चार्तुवर्ण व्यवस्था नाकारली*÷

     संत बसवेश्वरांनी चार्तुयवर्ण व्यवस्था नाकारली.ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,शुद्र ही व्यवस्था असु शकत नाही.माणुस जन्माने शुद्र नव्हे तर कर्माने ठरेल .कर्मावर तो ब्राह्मण ठरेल.त्याला कमी लेखु नका.मानवात स्रीव पुरुष केवळ दोन जाती आहेत.त्यामुळे चार्तुवर्ण व्यवस्था नाकारण्याचे बसवेश्वरांनी ठरवले.ते सिध्द करुन दाखवले.हे करताना त्यांना जात बहिष्कृत केले गेले.त्यांना त्रास दिला गेला.सनातनी कर्मठ व्यवस्थेने त्यांच्यावर हल्ले केले.तरी ही ते डगमगले नाहीत,


*अंधश्रध्दा व कर्मकांड ला विरोध*÷  त्या काळी मंदिर,पुजापाठ,अभिषैक,पशुबळी,अजाबळी,वेदांना महत्व ,ब्राह्मणी व्यवस्था,या कर्मकांडाला त्यांनी विरोध केला.समता प्रस्थापित करतो तो धर्म ही धर्माची साधी व्याख्या केली.जो सर्वांना समावुन घेतो तै धर्म.जो सर्वांना समान मानतो तो धर्म .म्हणुन पुजापाठ,वेदाध्ययन ,होमहवन,कर्मकांड,पुजा,मठव्यवस्था,आचार्य,जंगम,मठाधिपती यांची दादागीरी मोडुन काढली.शिवमंदिर सर्व बहुजनांना खुली केली.मठ,मठाधिपती,शंकार्चाय,लिंगस्वामी यांची दादागिरी,यांचे देव सामान्य लोकांतील मध्यस्ती त्यांना मान्य नव्हती.सर्वांना मठात,मंदिरात,शिवमंदिरात त्यांनी प्रवेश दिला.


*समता व समानता माननारा लिंगायत धर्म स्थापन केला*÷

      त्या काळी दक्षिणेत विशेषता कर्नाटक धारवाड,आंध्र,तेलंगणा,तामिळ प्रांतात धर्माची व धर्माच्या नावाने भेदभाव प्रचंड जातीयता,कर्मकांड जातीय उतरंड होती .ही उतरंड मोडायची असेल तर समता व समानता देणारा धर्म असायला हवा म्हणुन त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली.ज्यात त्यांनी साळी ,माळी ,बोगार(कासार),तेली,सुतार,लोहार,चांभार,कुंभार,धनगर,वाणी,कोष्टी,जंगम,धनिया,वैश्य अशा सर्व जातीनां प्रवेश दिला.त्या सर्वांना एकाच लिंगायत  पंथाखाली आणले.त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार ला मान्यता दिली.पुढे हा पंथ धर्म म्हणुन पुढे आला.शिवमंदिरात सर्वांना प्रवेश,कपाळावर तीन पट्टे विभुती,गळ्यात रुद्राक्ष व लिंग धारण करणे,शिवआराधना करणे,सर्वांना प्रेम देणे,दान धर्म करणे,भुकेल्यास अन्नदान करणे,पाणी दान,चारा औषधदान ही संकल्पना रुजवली.मुळात  या सर्व जाती लिंगायत या धर्माखाली  एकत्र आले.त्यामुळे आपोआपच समता,समानता आली.रोटीबेटी व्यवहार होवु लागले.लिंगायत हाच सर्वश्रेष्ठ धर्म झाला.त्यामुळे जातीयता,धार्मिकता नष्ठ झाली.पण दुर्देव भगवान महावीर ,भगवान बौध्द यांच्यानंतर जसे जैन व बौध्दांत परत कर्मकांड आले तसेच लिंगायत धर्मात ही बसवेश्वरांनंतर लिंगायत कासार,लिंगायत वाणी,लिं.कुंभार अशा जाती प्रखर होत गेल्या.रोटीबेटी व्यवहार परत जातीअंर्गत होवु लागले.उदा.जसे लिंगायत कुंभार मुलगा,लिंगायत कुंभार समाजाचीच मुलगी करु लागला.सोवळ,पुजापाठ,कर्मकांड,भेदभाव,उच्चनिचता परत लिंगापत पंथात ही आली.हे दुर्देवाने म्हणावे लागेल.महापुरुषांच्या विचारांचा पराभव त्यांचेच अनुयायी करतात हा इतिहास येथे ही संत बसवेश्वरांच्या बाबतीत लागु झाला.


*महिलानां जागृत करुन अन्यायी व्यवस्था मोडली*÷

        संत बसवेश्वरांनी महिलांना ही चळवळीत समाविष्ट केले.महिलांवरील अन्यायाला वाचा फोडली.पडदा पध्दतीला विरोध्द केला.स्रीयांनी डोक्यावर पदर घ्यावा असे काही नाही.पडद्यामध्ये स्रीलि ठेवुन भेदभाव वाढत जाणार,ती स्वतंत्र आहे त्यामुळे स्रीस्वातंत्र्याची संकल्पना त्यांनी रुजवली.विधवांचे पुर्नविवाह केले.त्यांना सन्माने जगण्याचा मार्ग दाखविला.मासिक पाळी हा विटाळ नाही तो निसर्गधर्म आहे.स्री या काळात उलट अधिक  सशक्त होईल या कडे लक्ष द्या,त्याला विटाळ न मानता नवनिर्मिती साठी ती निसर्गाने दिलेले तिला वरदान आहे असा वैज्ञानिक दृष्टीकोन त्यांनी रुजवला.सतीप्रथेला विरोध केला.विधवा स्रिच्या केशवपणाला त्यांनी विरोध केला.मंदिर,मठात स्रीयांना प्रवेश दिला.ज्ञान,धर्मग्रंथाचे अध्ययन करण्याचा अधिकार त्यांनी स्रीयांना दिला.


*आंतरजातीय विवाहास मान्यता*÷ आतंरजातीय ,आंतर धर्मिय विवाहास संत बसवेश्वरांनी मान्यता दिली.त्यासाठी त्यांनी स्वःता  मागास जातीतील संत त्यांचा मुलगा शिलवंत याचा विवाह ब्राह्मण कन्या बसवंतीशी लावुन दिला.त्याकाळी ही खुप मोठी क्रांती होती.त्यामुळे त्यांच्यावर प्राणघात हल्ले झाले.पण त्यांनी समाजाला समता समानता आणण्यासाठी लिंगायत आंतरजातीय विवाह कसे व्हायला हवे हे कृतीतुन दाखवुन दिले.


*अनुभव मंटप लोकशाही संसदेची स्थापना*÷

         अनुभव मंटप या लोकशाही संसदेची स्थापना त्यांनी केली.बाराव्या शतकात सुमारे ९०० वर्षापुर्वी लोकशाही तील  समता,समानता,धर्मनिरपेक्षता,स्वातंत्र्य,बंधुता ही तत्वे त्यांनी स्वःता अमलात आणली.अनुभव मंटप ही संस्था स्थापन करुन लोकांच्या समस्या,न्याय,हक्क यांची चर्चा केली जात असे.त्यांच्या अन्यायाला वाचा अनुभव मंटप मधुन फोडली जात.संत बसवेश्वरांनी संसदिय लोकशाही प्रणाली बाराव्या शतकात जगाला दिलि,त्यामुळे संसदिय लोकशाहीचे चे जनक ठरतात.संत बसवेश्वर हे लोकशाहीचे आद्य प्रवर्तक आहेत.


*विद्रोही लेखक,कवी व साहित्यीक संत बसवेश्वर*÷

       सुमारे ९०० वर्षापुर्वी समाजाची ही मांडणी करणारे संत बसवेश्वर समाजासाठी,धर्मव्यवस्थेसाठी विद्रोही ठरले.पण तरीही ते डगमगले नाहीत.त्यांनी प्रबोधनासाठी लेखन चालु ठेवले.कन्नड भाषेतुन त्यांनी लेखन केले.याला "संत बसवेश्वरांची वचने" म्हणुन ती प्रसिध्द आहेत.मराठीत ही सध्या त्यांचे अनुवाद पाहयला मिळतात.कविता,काव्य,लेखन,विपुल ग्रंथ लेखन करुन त्यांनी प्रबोधनाची चळवळ सुरु ठेवली.संस्कृत भाषेचा वापर न करता त्यांना जनसामान्याची कन्नड,तेलगु,मराठी भाषा वापरुन  लोकांना प्रभावित केले.


*भेदभाव दुर करणारे समतानायक*÷भेदभाव,अंधश्रध्दा,कर्मकांड,अज्ञान समाजास लागली किड असताना,सनातनी कर्मठ लोक,मठ मठांधिपती,शंकाराचार्य त्यांची धार्मिक व्यवस्था याला पहिल्यांदा  संत बसवेश्वरांनी सुरुंग लागला.ही उतरंड त्यांना मान्य नव्हती.म्हणुन  समतावादी समाज निर्माण करणारे ते विश्वनायक समातानायक होते.

       अशा समतानायक,विश्ववंदनिय,जगतगुरु,लोकशाहीचे आद्य प्रवर्तक तथा जनक संत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी नमन!


=======================

©

*श्री.पंकज रा.कासार काटकर*

        *सहशिक्षक*

*जि.प.प्रा.शाळा काटी.*

*मु.पो.काटी.ता.तुळजापुर*

     *जि.उस्मानाबाद*

*मो.नं.-९७६४५६१८८१*

ईद-ए-मिलाद

 ईद-ए-मिलाद म्हणजे ‘ अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी ‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.


अर्थ


ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे.



रमजानची प्रार्थना

सणाचे स्वरूप


परस्पर शुभेच्छा

पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात .या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.


ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसऱ्या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात.[१] मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी तयार मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात.[२]


रमजान ईदचा दुसरा दिवस हा 'बासी ईद' नावाने ओळखला जातो.


खुलताबादचे स्थानमहात्म्य

संपादन करा

ईद-ए-मिलादच्या दिवशी खुलताबादचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. खुलताबाद येथील हजरत बावीस ख्वाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात १४०० वर्षांपूर्वीचा हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख ‘पैराहन-ए-मुबारक‘ गेल्या ७०० वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आलेला आहे. हजरत महंमद पैगंबर यांच्या पोशाखामुळे खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला काश्मीरमध्ये असलेल्या हजरतबल दर्ग्याच्या बरोबरीचे महत्त्व आहे. येथे दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम भाविक मोठया श्रद्धेने लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. येथील समोरच असलेल्या हजरत ख्वाजा बु-हानोद्दिन यांच्या दर्ग्यात ‘मुॅं-ए-मुबारक‘ (मिशीचा केस) व पैराहन-ए-मुबारक (पवित्र पोशाख) ईद-ए-मिलादच्या दिवशी दर्शनासाठी खुला केला जातो. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त ‘मुबारक‘ या पर्वकाळात हा पोशाख व मिशीचा केस दर्शनासाठी काचेच्या पेटीत खुला ठेवण्यात येतो. यावेळी गोडभात प्रसाद म्हणून वाटला जातो.


प्रेषित हजरत महंमद पैगंबर

संपादन करा

इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स. ५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. जन्माअगोदरच महंमद पैगंबर यांचे पितृछत्र हरपले होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीना पण देवाज्ञा झाली. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला. आपल्या जीवनकाळात हजरत मोहमद यांनी समस्त मानवजातीला उदारता, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती.


हे सुद्धा पहा

संपादन करा

इस्लाम धर्म

संदर्भ

बाह्यदुवे

Friday 25 December 2020

 



आयझॅक न्यूटन

भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ
.

सर आयझॅक न्यूटन (एफ.आर.एस्.) (२५ डिसेंबर १६४२ - २० मार्च १७२७) हे एक भौतिकशास्त्रज्ञगणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.

सर आयझॅक न्यूटन
GodfreyKneller-IsaacNewton-1689.jpg
गॉडफ्री नेलर याने इ.स. १६८९ मध्ये रंगविलेले न्यूटनचे व्यक्तिचित्र
पूर्ण नावआयझॅक न्यूटन
जन्मडिसेंबर २५इ.स. १६४२
वूल्सथॉर्प-बाय-कोल्स्टरवर्थलिंकनशायरइंग्लंड
मृत्यूमार्च २०इ.स. १७२७
केन्सिंग्टनलंडनइंग्लंड
निवासस्थानइंग्लंड Flag of England (bordered).svg
नागरिकत्वब्रिटिश
राष्ट्रीयत्वइंग्लिश Flag of England (bordered).svg
धर्मख्रिश्चन
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्रज्ञगणितज्ञखगोलशास्त्रज्ञ
कार्यसंस्थाकेंब्रिज विद्यापीठ
प्रशिक्षणट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ
ख्यातीगुरुत्वाकर्षण,
न्यूटनचे यामिक (न्यूटोनियन मेकॅनिक्स),
कॅल्क्युलस,
प्रकाशविज्ञान (ऑप्टिक्स)
आईहन्ना आयास्कॉफ

बालपणसंपादन करा

सर आयझॅक न्यूटन डिसेंबर २५इ.स. १६४२ रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात जन्मले. आयझॅक न्यूटनचे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईने दुसरे लग्न केल्यामुळे आयझॅक त्याच्या आजीजवळ राहिले.
वयाच्या १२ वर्षांपर्यंत आयझॅक जेमतेम दोन वर्षे शाळेत होते. त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात त्यांचे सावत्र वडील स्मिथ वारले. आपल्या नूतन बाळाला घेऊन आयझॅकची आई हाना लिंकनशायरला परत आली. तिने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले. एक दिवस दुपारी आयझॅक दमूनभागून झाडाच्या सावलीत बसले होते. मंद वारा वाहत होता. आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आयझॅकना वाटले, आपण वार्‍याचा वेग मोजावा. त्यांच्याजवळ वेग मोजायला काही साधन नव्हते. आयझॅकने एकदा वार्‍याच्या दिशेने उडी मारली. जिथे उडी पडली तिथे एक दगड ठेवला. मग जरा वेळाने वार्‍याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला. या दोन दगडांतील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक मोजत असताना त्यांचे मामा, विल्यम आयस्कॉफ शेतावर आले. विल्यम आयस्कॉफ केंब्रिजमध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक होते. त्यांनी विचारले, "हे तू काय करतोस?" आयझॅक म्हणाले, "मी वार्‍याचा वेग मोजतो आहे". या उत्तराने मामा अवाक झाले. त्यांना आयझॅकची तीव्र असामान्य बुद्धी कळली. घरी जाऊन त्यांनी हानाला आयझॅकला शाळेत घालायला सांगितले. १६६१ मध्ये आयझॅक ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर्वांनाच माहीत आहे. १६६८ मध्ये त्यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली. आजही लंडन म्युझियममध्ये ही दुर्बीण आहे. संदर्भ हवा ]

Broom icon.svg



कार्यसंपादन करा

या रॉयल सोसायटीचे पत्रव्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी नियुक्त करण्यात, आणि कोण रॉयल सोसायटीचे व्यवहार करण्यासाठी न्यूटन पासून योगदान बाहेर काढणे हेतू एक पत्रव्यवहार उघडण्यात आले होते Hooke सह 1679-80 मध्ये अक्षरे थोडक्यात विनिमय करून उत्तेजित मागे गेले. मध्ये न्यूटन reawakening व्याज खगोलशास्त्रीय वस्तू, त्याला योहान Flamsteed पत्रव्यवहार ज्या 1680-1681 च्या हिवाळ्यात, एक धूमकेतू देखावा आणखी प्रेरणा प्राप्त झाली आहे. हुकयांच्या सह एक्सचेंज केल्यानंतर, न्यूटन ग्रहांच्या orbits च्या कक्षेत फॉर्म परिणाम होईल अशी पुरावा बाहेर काम त्रिज्या वेक्टर चौरस व्यस्त प्रमाणात केंद्राकडे जाणारी शक्ती (- इतिहास आणि डी मागितले corporum मध्ये gyrum न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम पहा). न्यूटन एडमंड हॅले आणि डे मागितले corporum मध्ये gyrum मध्ये ते रॉयल सोसायटीचे डिसेंबर १६८४.रॉयल सोसायटी नोंदणी पुस्तक कॉपी होते जे नऊ पत्रके वर लिहिलेल्या मुलूख करण्यासाठी त्याच्या परिणाम कळवली हा मुलूख न्यूटन विकसित मध्यवर्ती भाग समाविष्ट आणि प्रिन्सिपिया तयार करण्यात आली.
संदर्भ हवा ]

प्रिन्सिपिया एडमंड हॅले प्रोत्साहन आणि आर्थिक मदतीने इ.स. 1687 5 जुलै रोजी प्रकाशित झाले. हे काम, न्यूटन गती तीन सार्वत्रिक नियम नमूद केले आहे. हे दोन्ही कायदे कोणत्याही ऑब्जेक्ट संबंध, सैन्याने शास्त्रीय रचना पाया आर्थिक अडचणीत आलेल्या व्यवसायातील, आणि परिणामी गती यावर अभिनय वर्णन. ते लवकरच मागे गेले राहील. तो गुरुत्वाकर्षण म्हणून ओळखले होते, की परिणाम लॅटिन शब्द gravitas (वजन) वापरले, आणि वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा कायदा व्याख्या.
त्याच काम, न्यूटन, 'पहिला आणि शेवटचा प्रमाण वापरून भौमितीक विश्लेषण खडा सारखी पद्धत सादर हवेत आवाज गती (बॉयल नियम आधारित) प्रथम विश्लेषणात्मक निर्धार दिला, पृथ्वीच्या spheroidal आकृती oblateness अनुमानित पृथ्वीवरील oblateness वर चंद्र गुरुत्वाकर्षणाचा आकर्षण एक परिणाम म्हणून equinoxes च्या विषुचलन या अहवालात, चंद्र मोशन मध्ये अनियमितता गुरुत्वाकर्षणावर अभ्यास सुरू धूमकेतू च्या orbits, आणि बरेच काही निश्चित एक सिद्धांत प्रदान.
न्यूटन गणिती अर्ज 8 खंड प्रकाशित कोण टॉम Whiteside (1932-2008), मते, तो न्यूटन पुढील 200 वर्षे गणित विकास बाहेर मॅप, आणि Euler आणि इतर मुख्यत्वे त्याच्या योजना चालते असे म्हणतात की, अतिशयोक्ती आहे. पृथ्वीवरून आकाशाच्या दिशेने भिरकावल्या गेलेल्या वस्तूचा वेग वाढवत जाऊन दर सेकंदाला ११.२ किलोमीटर केला असता तर ती वस्तू पृथ्वीपासून दूरच जात राहील आणि ती कधीच परत येणार नाही, असा निष्कर्ष न्यूटनने काढला होता. संदर्भ हवा ]

न्यूटन ह्यांचे गतिविषयक नियमसंपादन करा

=== पहिला नियम === newtons first law कुठल्याही शरीरावर बाह्य अस्थिर बल जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत ते शरीर एक सरळ रेषा किंवा समान गतीत कार्यरत राहते. ह्याला जडत्वाचा नियमही म्हणतात.

=== दुसरा नियम === Newton SECOND law संवेगाचे परिवर्तनाचा दर हा प्रयुक्तबदलाशी समानुपती असून संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होतो.
F=ma

तिसरा नियमसंपादन करा

प्रत्येक क्रियेला समान , विरुद्ध व समकालीन प्रतिक्रिया असते .

आयझॅक न्यूटन यांची सही

गुरूत्वाकषणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17वया शतकात लावला पृथ्वी चे गुरूत्वीय बरं हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तू चया च्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तू ची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शुन्य होते. मग ती वस्तु आणखी.वर न जाता खाली पडायला लागते.खाली पडताना तिच्या. गतीत गुरूत्वीय बलामुळेच सतत वाढ होत जाते.